
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक पुढच्या महिन्या निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्य सचिवपदासाठी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चढाओढ सुरू आहे. या शर्यतीत सध्या मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, इक्बालसिंह चहल, राजेश अगरवाल आणि राजेश कुमार यांची नावं पुढे आहेत. पण यात भूषण गगराणी या पदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण गगराणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्या मर्जीतले आहेत, असे सांगितले जाते.
भूषण गगराणी हे मार्च 2026 मध्ये सेवानिवृत्त होतील. पण राज्याच्या सचिवपदासाठी राजेश कुमार हे ज्येष्ठ आहेत. मात्र, राजेश कुमार याच वर्षी 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होतील. त्यामुळे कुमार सचिव झाल्यास त्यांना फक्त दोन महिन्यांचा कार्यकाल मिळेल. कुमार यांच्यानंतर राजेश अगरवाल हे ज्येष्ठ आहेत. आणि अगरवाल हे नोव्हेंबर 2026 ला निवृत्त होतील. इक्बालसिंह चहल हे सुद्धा या पदासाठी इच्छूक आहेत. पण यात भूषण गगराणी बाजी मारतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण गगराणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले असल्याचे बोलले जाते.