मालिकेतील नायिका ब्राह्मणच का? सुजय डहाकेची लायकी निघाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत फक्त ब्राह्मण अभिनेत्री दिसतात. इतर मराठी जातीच्या अभिनेत्री का दिसत नाहीत, असा सवाल करणाऱया दिग्दर्शक सुजय डहाकेवर आता सोशल मीडियावर सर्वजण तुटून पडले आहेत. तुम्हाला कुणी स्पष्टीकरण द्यावे एवढी तुमची लायकी नाही असे त्याला सुनावले जात आहे.\\

अभिनेता सौरभ गोखले याने तर फेसबुकवर सुजयला तडकावले असून पुन्हा कलाक्षेत्रात जातीपातीचे राजकारण घुसवण्याचा प्रमाद घडला तर सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर आमच्या भावना उमटविण्यात येतील असे म्हटले आहे.

स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके….

आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर…

Posted by Sauraabh Gokhaale on Thursday, March 5, 2020

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप…

Posted by Shashank Shirish Ketkar on Wednesday, March 4, 2020

याआधीही शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनीही सुजयला धारेवर धरले होते. सुजय डहाकेने वक्तव्य मागे घ्यावे, नाहीतर त्याच्या चित्रपटाचे काय करायचे याचा विचार आम्ही करू, असा इशारा ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे.