
सामना प्रतिनिधी । नगर
राष्ट्रवादीचा उमेदवार गेल्या साडेचार वर्षात आमदार असून प्रश्न मांडू शकला नाही. सिव्हिल हडकोमधील म्हाडाचे प्रश्न मुंबई म्हाडामध्ये एकदा तरी मांडले का हे दाखवून द्यावे. कारण त्यांचा प्रवास फक्त आमरधाम ते तोफखाना एवढाच आहे. हा उमेदवार आमदार विधानसभेत फक्त चार मिनिट बोलला आणि त्याचे वडील विधान परिषदेत आठ वर्षात एक शब्द बोलले नाही, असा घणाघाती आरोप युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केला.
यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, अॅड. अभय आगरकर, दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी, नगरसेवक योगीराज गाडे, स्वप्नील शिंदे, भैय्या गंधे, मनोज दुलम, अमोल येवले, संगीता खरमाळे, सुमित कुलकर्णी, उद्य कराळे, काका शेळके, अशोक दहिफळे, अमित गटणे सह परिसरातील नागरिक, महिला व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुजय विखे पुढे म्हणाले, मग यांना आमदार, खासदार कशाला होयचे. मुंबई, दिल्ली फिरायला का लोकांना त्रास देण्यासाठी, गुंड पाळण्यासाठी, हत्याकांड करण्यासाठी, पोलीस अधीक्षक कार्यालय फोडण्यासाठी. या समोरच्या उमेदवाराची घोषणा झाली त्याच दिवशी माझे टेंन्शन समोर शिफ्ट झाले. मी लोकांना म्हणतो टेंन्शन मला नाही तुम्हाला आहे. तुम्ही चुकीचे बटन दाबले का तुमचे टेंन्शन सुरू. कारण पुढच्या पाच वर्षाचे तुमचे, कुटुंबाचे, शहराचे भविष्य ठरणार आहे.

























































