सुकन्या कुलकर्णी-सुप्रिया पाठारे पहिल्यांदाच एकत्र

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या मराठी चित्रपटात सुकन्या कुलकर्णी आणि सुप्रिया पाठारे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्या एकत्र काम करत आहेत. ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

महिलाप्रधान चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांच्या भूमिका आहेत. ‘आम्ही दोघींनी खूप धमाल केली सेटवर. दोघींनाही सेटवर सर्व तयारीनिशी  यायला आवडते.  कुणी काही मागितले आणि आमच्याकडे ती गोष्ट नसेल, तर आम्हालाच खूप चुकल्यासारखे वाटते. आम्ही दोघी बिनधास्त जीवन जगणाऱया आहोत. आमच्यासमोर आव्हाने येतात ती आपण सक्षम आहोत म्हणून, असे मानून आम्ही त्यांना सामोरे जातो,’ सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, नाच गं घुमा या सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यापासून सिनेमाची जोरदार चर्चा आहे.