शाब्बास सुमित! हरलास, पण फेडररविरुद्ध इतिहास घडवलास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sumit-nagal

अमेरिकन ओपनमध्ये मंगळवारचा दिवस हिंदुस्थानसाठी खास ठरला आहे. सुमित नागल या हिंदुस्थानी खेळाडूने आज रॉजर फेडररला चांगली झुंज दिली. या सामन्या सुमितचा पराभव झाला असला तरी त्याने दिलेली लढत ही ऐतिहासिक ठरली आहे. फेडरर विरुद्ध पहिला सेट जिंकणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. तर जागतिक स्तरावर चौथा खेळाडू म्हणून त्याचे नाव नोंदवण्यात आले आहे.

रॉजर फेडररविरुद्ध खेळताना सुमितने पहिला सेट 6-4 अशा फरकाने जिंकला. याआधी कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडून फेडरर विरुद्ध असा पराक्रम केला नव्हता. तर जागतिक स्तरावर पिटर व्हेसल्स (नेदरलँड), जोस अॅकासुसो (अर्जेंटीना), फ्रान्सिस ताईफोई (अमेरिका), यांनी असा पराक्राम केला होता. आता त्या यादीत सुमितचे नाव देखील जोडले गेले आहे.

आज पहिल्या सेटमध्ये फेडरर आणि सुमित अशी जोरदार टक्कर पाहायला मिळाली. एका क्षणाला दोघेही 4-4 गुणांवर होते. त्यानंतर सुमितने चांगला खेळ करत पुढले दोन्ही पाईंट्स जिंकले आणि सेट आपल्या खिशात घातला. त्यानंतर मात्र फेडररने 1-6, 2-6, 4-6 असे करत सामना जिंकला.