
वडार समाजातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला मिळण्यासाठी 1961 सालचा पुरावा व वंशावळ मागितली जाते. वडार समाजाच्या विद्यार्थ्यांकडे तशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांना जातीचा दाखला मिळत नाही आणि त्याअभावी ते शासकीय लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे दाखल्यासाठी त्यांच्याकडे पुरावा व वंशावळ मागणीची अट रद्द करावी, याकडे विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

























































