
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्सने आपल्या साथीदारांसोबत अंतराळात ख्रिसमस सण साजरा केला. सुनीता यांनी सांताची टोपी परिधान केली होती. तसेच खास ख्रिसमसनिमित्त सजावट केली होती. अंतराळात ख्रिसमस साजरा केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत सुनीता यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले दिसत आहे. परंतु हा फोटो खरा की बनावट आहे, यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
To everyone on Earth, Merry Christmas from our @NASA_Astronauts aboard the International @Space_Station. pic.twitter.com/GoOZjXJYLP
— NASA (@NASA) December 23, 2024



























































