
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने नुकतेच सुपर फॉलोज हे फीचर लाँच केले आहे. त्यामुळे क्रिएटर्सना आपला कंटेट युजर्सपर्यंत पोहोचवण्याची आणि महिन्याकाठी चांगली कमाई करण्याची संधी मिळणार आहे. सध्या हे फीचर अमेरिका आणि कॅनडात केवळ आयओएस युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. येत्या काही आठवडय़ांत जगभरातील आयओएस युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध होणार आहे. 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्यांना या फीचरचा फायदा होणार आहे. तसेच महिनाभरात किमान 25 वेळा ट्विट केलेले असावेत.




























































