सुपरस्टार रजनीकांत ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

सुपस्टार रजनीकांत यांनी शनिवारी दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगलेला हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे क्रिकेट सामना पाहण्यासाठी रजनीकांत यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर ते खास मुंबईत आले होते. रजनीकांत सध्या कुटुंबासह मुंबईत आहेत. यानिमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांची ही सदिच्छा भेट घेतली.