
कॅश कांडप्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही चौकशी समितीसमोर का हजर झालात? आता तुम्ही चौकशी समितीच्या अहवालावर आक्षेप का घेत आहात? तुम्ही निर्णय आधीच आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला का? असे सवाल न्यायालयाने केले. याप्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वर्मा यांनी त्यांच्या घरी लागलेल्या आगीत अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल आणि महाभियोगाची शिफारस रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. अहवालात न्यायमूर्ती वर्मा यांना दोषी ठरवण्यात आले आहे.