
प्रभावी औषधांच्या विक्रीसाठी नियम आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी होतेय का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. औषधांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांकडून डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू, परदेश दौरे तसेच अन्य लाभ देण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना प्रभावी औषधे मिळत नाहीत. परिणामी, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर औषध कंपन्यांसाठी कठोर नियम बनवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.
कंपन्यांच्या चुकीच्या मार्केटिंगममुळे गरजेपेक्षा अधिक औषधे देणे, चुकीची औषधे लिहून देणे, असे प्रकार डॉक्टरांकडून होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.