मादरXX शिवी दिल्याने गुन्हा होत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

मादर.. व सन ऑफ अ… या शिव्या दिल्याने गुन्हा होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हे शब्द अपमानजनक, अश्लील किंवा अपशब्द असले तरी ते फौजदारी कायद्यानुसार अश्लील ठरत नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्या. संजय करोल व न्या. विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. एखादे शब्द कामुक भावना जागृत करणारे, वासनाधीन किंवा पीडिताच्या नैतिकतेचे पतन करणारे ठरत नाहीत. पीडिताचे चारित्र्यहनन करण्यास प्रवृत्त करणारे ठरत नाहीत, तोपर्यंत कायद्याच्या चौकटीत हा गुन्हा ठरू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

समान संकल्पना नाहीत शिवीगाळ, अश्लीलता व असभ्य भाषा या समान संकल्पना नाहीत. हे शब्द कितीही अप्रिय, असंस्कृत किंवा आक्षेपार्ह वाटले तरी त्याचा वापर झाला म्हणजे ते अश्लील ठरत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अश्लीलता नाही महत्त्वाचे म्हणजे घाणेरडे किंवा अपमानास्पद शब्द ऐकून किळस, संताप, तिरस्कार किंवा धक्का बसू शकतो. मात्र हे शब्द अश्लील ठरवून त्याला गुन्हा ठरवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण…

जमिनीच्या वादातून हाणामारी झाली. यात एकाला गंभीर दुखापत झाली. मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी झालेली शिक्षा रद्द करण्यासाठी आरोपीने याचिका दाखल केली. ही याचिका अंशतः मंजूर करताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला. या मारहाणीत तक्रारदाराला गंभीर दुखापत झाली आहे. या गुन्ह्यासाठी न्यायालय उठेपर्यंतची साधी कारावासाची शिक्षा व ५० हजारांचा दंड सर्वोच्च न्यायालयाने अपिलात कायम ठेवला.