
सामना प्रतिनिधी । नगर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय काहींच्या राजकीय पोळ्या भाजल्या जात नाही अशी खोचक टीका सुप्रीया सुळे यांनी यावेळी केली.
सत्ताधारी पक्षाशी संबंध असेल तर ‘सौ खून माफ’, राम कदमांवर सीएमचे…
मंगळवारी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी आणि भारिपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगर येथे शरद पवारांवर टीका केली. याबाबत सुप्रीया सुळे यांनी विचारणा केली असता, प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे, मात्रशरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींच्या राजकीय पोळ्या भाजल्या जात नाही अशी खोचक टीका केली.
दरम्यान, आरक्षणाचा विषय सध्या सर्वत्रच सुरू आहे. आत्महत्यांमधून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आत्महत्या न करता संघर्ष करण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे, असेही सुळे यांनी यावेळी म्हणाल्या.




























































