‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ सुप्रिया सुळे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून मंत्री दिपक केसरकर यांना फटकारले आहे. दिपक केसरकर यांनी त्या तरुणीची जाहिर माफी मागावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

”महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

”एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून केली आहे.