रामाचा अपमान करेल तो नरकात जाईल! काँग्रेस नेत्याचं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभु श्रीराम यांचा अपमान करणारा माणूस नरकात जाईल, असं विधान एका काँग्रेस नेत्याने केलं आहे. निषाद पार्टीच्या एका नेत्याने प्रभु श्रीराम हे राजा दशरथ यांचे पुत्र नव्हते, असं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना नेत्याने हे विधान केलं आहे.

एका वृत्तवाहिनीवर या विषयी वादविवाद आणि चर्चा घेण्यात आली. त्यावेळी निवेदिकेच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे नेता सुरेंद्र राजपूत म्हणाले की, सनातन धर्माचा जो अपमान करेल तो पापाचा धनी होतो. जो सनातन धर्म आणि प्रभू श्रीरामाचा अपमान करेल, त्याच्या नावाने राजकारण करेल तो तर निश्चितच नरकात जाईल, असं राजपूत म्हणाले आहेत.

भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या निषाद पार्टीचे नेता संजय निषाद यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्री राम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हते असं विधान केलं होतं. त्यावर उत्तर देताना राजपूत म्हणाले की, श्री रामाच्या वडिलांविषयी भाष्य करून संजय निषाद यांनी राजा दशरथ आणि माता कौसल्या यांचा अपमान केला आहे.

राजपूत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देत भाजपचे नेता सुधांशु त्रिवेदी म्हणाले की, यांनी रामाला काल्पनिक किंवा खोटं ठरवण्याबद्दल यांनी कधी माफी मागितली नाही. पण, राजपूत यांनी ही गोष्ट चांगली सांगितली आहे की, रामासोबत जो द्रोह करेल तो नरकात जाईल. जेव्हा रामजन्मभूमीचं आंदोलन सुरू होतं, तेव्हा तुम्ही उत्तर प्रदेश विधानसभेत 287 जागांवर तर केंद्रात 402 जागांवर होतात. पण, आज तिथेच तुम्ही फक्त 7 जागांवर आहात, असं त्रिवेदी म्हणाले आहेत.