हिंदुस्थानी राजनैतिक अधिकाऱ्यांची कॅनडाकडून हेरगिरी

निज्जर हत्येप्रकरणी आरोप करण्याआधी पॅनडाने हिंदुस्थानी राजनैतिक अधिकाऱ्यांवर गेले काही महिने पद्धतशीर पाळत ठेवून बरेच पुरावे गोळा केले होते. पह्न कॉल्सवरील आणि प्रत्यक्ष संभाषण व इतर माहितीच्या आधारे पॅनडाच्या तपास यंत्रणांनी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांवर दबावही टाकला होता, अशी माहिती आता उघड झाली आहे.

हिंदुस्थानी दूतावासांतील राजनैतिक अधिकाऱ्यांवर गुप्तहेरांकरवी गेले काही महिने नजर ठेवली जात होती. पॅनडा सरकारमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, इतर व्यक्तींशी झालेले थेट संभाषण, दूरध्वनी संभाषण असे सारे तपशीलवार पुरावे गोळा करत पॅनडाने एक अहवालच तयार केला आहे.

एका भेटीत या पॅनडाच्या तपास यंत्रणांकडून हिंदुस्थानी अधिकाऱ्यांसमोर बंद दरवाजाआड सर्व तपशील मांडून दबाव टाकण्यात आला. तेव्हा निज्जरच्या हत्येमध्ये हिंदुस्थानी सरकारच्या हस्तक्षेपाचा पुरावा असल्याचे हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना नाकारता आले नाही, मात्र तपासात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे हा राजनैतिक पेचप्रसंग तीव्र झाला.

या अहवालाच्या बळावरच पॅनडाने घाईघाईत आरोप केलेले नसून पूर्ण गांभीर्याने केले आहेत, असे पॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टडो यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीनंतर सांगितले होते.

पॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस आणि इतर तपास अधिकाऱ्यांनी निज्जरच्या हत्येच्या तपासात हिंदुस्थानचे सहकार्य मिळवण्यासाठी अनेकदा हिंदुस्थानला गेल्या काही महिन्यांत भेट दिली होती. जोडी या गेल्या ऑगस्टमध्ये आणि आता जी-20 च्या निमित्ताने टडो यांच्यासमवेत हिंदुस्थानात आल्या होत्या.

पॅनडाने या पुराव्यांच्या जोरावर हिंदुस्थानवर आरोप केले असले तरी अद्याप या आरोपांची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. दरम्यान, हिंदुस्थानने टडो यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

हिंदुस्थानने दिलेल्या पुराव्यांवर कारवाई नाही

निज्जर हा खोटय़ा पासपोर्टवर पॅनडात गेला होता. त्याला नागरिकत्व कसे मिळाले हे गूढच आहे. त्याच्याविरुद्ध खून, दहशतवादी  कारवायांसाठी गुन्हे दाखल होते. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीसही होती. हिंदुस्थानने दिलेल्या या पुराव्यांकडे पॅनडाने दुर्लक्ष केले. निज्जरने पाकिस्तानात जाऊन आयएसआयकडून प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे.