कब जन्म लेना है और कब मरना हमारे हाथ मे नही -सुशांत सिंहच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

982

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुशांत या चित्रपटात संजना सांघी नावाच्या नवोदित अभिनेत्रीसोबत झळकणार आहे.

14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेली सहा महिने सुशांत नैराश्यात होता. व्यावयासिक कारणामुळे तो नैराश्यात असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याप्रकरणी बॉलिवूडमधील काही बड्या मंडळींची पोलिसांनी चौकशीही केली. त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि यश राजची कास्टिंग डायरेक्टरचीही चौकशी झाली होती.

सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. दिल बेचारा लव्ह स्टोरी असून द फॉल्ट इन अवर स्टार या कादंबरीवर आधारित आहे. संजना आणि सुशांत एकाच कॉलेज मध्ये शिकत असतात. संजनाला कॅन्सर असतो आणि सुशांत तिच्या प्रेमात पडतो. मरण्यापूर्वी संजनाला आनंदात जगायचं असतं त्यासाठी सुशांत मदत करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. जनम कब लेना है, और मरना कब है, हम डीसाईड नही कर सकते. पर जीना कैसे हे हमारे हाथ मै है असा सुशांतचा शेवटचा डॉयलॉग आहे. 24 जुलै रोजी डिस्ने हॉटस्टावर मोफत हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या