
बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 शर्यतीत 45 वर्षांपर्यंतच्या पुरुष गटात सुशांत जेधे तर महिला गटात प्राजक्ता शिंदे यांनी अव्वल स्थान संपादले.
वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडलेल्या या शर्यतीत 3500 हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. या शर्यतीला भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक अजय खुराना, देबदत्त चंद, ललित त्यागीसुद्धा उपस्थित होते. मुंबईकरांचा उत्साह द्विगुणित करणाऱया या शर्यतीत 45 वर्षांवरील गटात पुरुषांमध्ये आरबीएस मोनी, समीर मांजरेकर आणि शिवानंद शेट्टी तर महिलांमध्ये इंदू टंडन, प्रतीभा नाडकर, वंदना चंद्रन यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.


























































