सुशीलादेवीला ज्युडोत  रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी आज हिंदुस्थानी ज्युडोपटू सुशीलादेवीने 48 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. अंतिम लढतीत तिला दक्षिण आफ्रिकेच्या मिकेला व्हाइटबोडीकडून  पराभव पत्करावा लागला. मात्र सुशीलाच्या पराक्रमामुळे तिला या गटात रौप्यपदकाची कमाई करता आली.

पुरुष गटातही ज्युडोपटू विजय यादवने 60 किलो वजनी गटात सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडोलिडसला पराभूत करीत कास्यपदकावर आपले नाव कोरले. ज्युडोतील या दोन पादकांमुळे आता या स्पर्धेतील हिंदुस्थानी पदकांची संख्या 8 वर गेली आहे.