आठ वर्षांनी मॅटवर परतणाऱ्या सुशीलकुमारला पराभवाचा धक्का

491

कझाकस्तानच्या  नूर सुलतान येथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत शुक्रवार हिंदुस्थानसाठी निराशेचा ठरला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या आणि जागतिक कुस्तीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सुशीलकुमारला आठ वर्षांनी मॅटवर पुनरागमन करताच अपयशाला सामोरे जावे लागले. सुशीलला या स्पर्धेत सलामीलाच 74 किलो वजनी गटात अजरबैजानच्या खाद्जहिमुराद गादझियुव यांच्याकडून 11-9 असा निसटता पराभव पत्करावा लागला.आता गादझियुवने अंतिम फेरीत मजल मारल्यास सुशीलला कांस्यपदक आणि ऑलिम्पिक पात्रतेची आशा धरता येणार आहे.

 2019 मध्ये रशियन राजधानी मॉस्कोत जागतिक कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावणारा सुशील पुरंगमंनातर दुर्दैवी ठरला.गादझियुवविरुद्धच्या लढतीत एक वेळ 9-4 अशी आघाडी मिळवणाऱ्या अनुभवी सुशीलने नंतर सलग 7 गुण गमावले.त्यामुळे त्याला पहिल्याच फेरीत 11 -9 अशी 2 गुणांनी निसटता पराभव पत्करावा लागला.आता ऑलिम्पिक पात्रतेसाठी आणि कास्यपदकासाठी सुशीलला गादझियेव आपल्या गटाच्या अंतिम फेरीत पोहोचो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करावी लागणार आहे.

अन्य हिंदुस्थानी मल्लांकडूनही निराशा 

सुशीलकुमारच्या धक्कादायक पराभवानंतर हिंदुस्थानच्या अन्य पहिलवानांनीही त्यांच्या गटात निराशजनक कामगिरी नोंदवत पराभव पत्करले. ७० किलो गटात करणला उज्बेकिस्तानच्या  इख्तियोर नावरुजोवने 7-0 असे सहज पराभूत केले. तर  125 किलोग्राम फ्रीस्टाइल क्वालिफिकेशन लढतीत सुमित मलिक पराभूत झाला.त्याला हंगेरीच्या  डेनियल लिगेतीने हरवले.92 किलोग्राम सलामीच्या लढतीत  प्रवीणला कोरियाच्या  चान्गजाई सू ने  पराभवाचा धक्का दिला.

आपली प्रतिक्रिया द्या