काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल भाजप-संघ नेहमीच पिल्लू सोडते, सुशीलकुमार शिंदेंची टीका

598

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून विविध नेत्यांकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच पिल्लू सोडते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, या वक्तव्याचा आज पुनरुच्चार केला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपली मते मांडली. पक्ष टिकवणे ही आजच्या स्थितीची गरज आहे. सर्व नेते आपापल्या मतदारसंघात काम करत आहेत. कारण, आमच्या जागा टिकवल्या नाहीत तर कींमत कोण करणार असेही शिंदे म्हणाले. राहुल काँग्रेसपासून दूर जात असल्याबाबत ते म्हणाले. राहुल गांधी काँग्रेसपासून दूर गेलेले नाहीत. प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. 13 ऑक्टोबरपासून ते राज्याच्या दौर्‍यावर येत आहेत. ते कामानिमित्त पाच दिवस अमेरिकेत गेले होते. ते खूप हुशार आहेत. हळुहळू ते पुढे येईलच असेही शिंदे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या