माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांंचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. येथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रुग्णालयात दाखल होत आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री एस एस अहलूवालिया, प्रल्हाद जोशी रुग्णालयात दाखल झाले आहेत.