
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेट परेड ग्राऊंडवर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल आर. एन. रवी यांनी सुवेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सुवेंदू अधिकारी यांच्यासह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, खुदीराम टुडू आणि निषिध प्रामाणिक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एनडीए आणि भाजपशासित राज्यातील 20 मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
Kolkata | BJP leader Suvendu Adhikari took oath as the first BJP Chief Minister of West Bengal since independence pic.twitter.com/ZoMOINT6RX
— ANI (@ANI) May 9, 2026


























































