स्वाभिमानला पुन्हा खिंडार, माजी सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांनी हाती घेतला भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील कुंदे देवस्थान समिती अध्यक्ष, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच रमेश परब आणि माजी सरपंच माधवी कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत व ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख डॉ.प्रवीण सावंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. हा शिवसेना पक्ष प्रवेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

कुडाळ तालुका शिवसेना सरपंच सेना तालुकाप्रमुख तथा कुंदे सरपंच सचिन कदम, उपविभाग प्रमुख तथा उपसरपंच सुशिल परब यांच्या प्रयत्नांने या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. रविवारी विजयभवन, कणकवली येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी याप्रसंगी महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख डॉ. प्रवीण सावंत,  विभाग प्रमुख विकास राऊत, कुंदे सरपंच सचिन कदम, उपसरपंच सुशील परब, शाखाप्रमुख वासुदेव राणे आदी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून खा.विनायक राऊत आणि आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुंदे गावातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. या विकास प्रक्रियेत सामील होण्यासाठीच सेनेत प्रवेश करीत असल्याची रमेश परब यांनी भावना व्यक्त केली. कुंदे संपुर्ण गाव हा एका विचाराने म्हणजेच, फक्त आणि फक्त शिवसेनेच्याच मागे राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रमेश परब यांच्या प्रवेशाने कुंदे गावात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. नविन प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत उचित मान सन्मान राखण्याची आणि संघटना बांधणी साठी नेहमी सोबत घेण्यात येईल असा आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ यांनी यांनी सांगितले.

माजी सरपंच रमेश परब यांच्या सोबत माजी सरपंच माधवी कदम, प्रकाश तायशेटे, अविनाश तायशेटे, बबन परब, पंढरी खांदारे, दिनेश परब, सातवसे, भानुदास तायशेटे, गौरीशंकर कदम, प्रवीण बागवे, पंढरी खांदारे, पांडुरंग गावडे, संजय खांडेकर, अविनाश तायशेटे, शिवराम खांदारे, विजय परब, लक्ष्मण सातोसे, संतोष तायशेटे, प्रकाश बोडेकर, प्रकाश तायशेटे, प्रकाश परब, अनिल परब, सत्यवान मोडक संचित बागवे, कृष्णा खांदारे, सिद्धेश खांडेकर आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यापूर्वी या आंब्रड मतदारसंघात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करून भगवा झेंडा हाती घेतला आहे.