स्‍वामी समर्थ केंद्र हे नादुरूस्‍त मानवी गाडया  दुरूस्‍तीचे गॅरेज- चंद्रकांत मोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव  

केंद्र म्‍हणजे चार भिंती नाहीत, तर जात-पात, धर्म गरीब-श्रीमंत, अबालवृध्द हा भेदभाव न करता आलेल्‍या दुःखी पिडामुक्‍त, रोगमुक्‍त, समस्यामुक्‍त करून घरी पाठविणे, थोडक्‍यात काय तर  स्‍वामी समर्थ केंद्र हे नादुरूस्‍त मानवी गाडया  विनामुल्‍य दुरूस्‍तीचे गॅरेज असल्‍याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणीत स्‍वामी समर्थ केंद्राचे गुरू माऊली आण्णासाहेब मोरे यांचे पुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी केले. कोपरगाव कृष्णाई मंगल कार्यालय येथील सत्‍संग मेळाव्‍यात ते बोलत होते. तर केंद्राची आचारसंहिता हि विज्ञानाधिष्ठीत असुन भगवंत रूपी स्‍वामी समर्थ हि दुःखांकडून शांतीकडे नेणारी गरूमाऊली आहे असेही त्‍यांनी सांगीतले.

चंद्रकांतदादा मोरे म्‍हणाले, जन्‍मदात्री आई पोटच्‍या पोरावर जास्‍त प्रेम करते, पण गरूमाऊली सर्व मुलांवर समान प्रेम करते. डोक्‍यावर बर्फ, जिभेवर मध, पायाला भिंगरी बांधा जीवनात यशस्वी झालांत म्‍हणुन समजा, आज लोक शरीराने स्‍थिर व मनाने अस्‍थिर झाले आहेत.  डोक्‍यात हजारो विचारांचे काहुर माजले आहे. पुर्वी पोटासाठी वणवण करावी लागत होती. आता पोट कमी करण्यासाठी वणवण करावी लागत आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, चुकीची का असेना पण स्‍पर्धेशिवाय प्रगती  नाही, वेगवान रस्‍त्‍यालाच गतीरोधक असतात. तसेच चांगल्‍या माणसाला विरोधक असणारच, पाठीवर शाबासकी स्‍वतहाच्‍या नव्‍हे तर दुसर्‍यांच्‍या हाताने घेता येते, चुकंल तर स्‍वतःहाची लाथ स्‍वतःहाच्‍या कंबरेत घालता येत नाही ती दुस-यांनेच घालावी लागते. असेही ते यावेळी म्हणाले.