मी फुलाचा फोटो टाकला तरी लोकं हस्तमैथूनाबाबत कमेंट येतात, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री स्वरा भास्कर हिला अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. तिच्या कोणत्याही पोस्टवर नेटकऱ्यांचे ट्रोलिंग पाहायला मिळते. तिच्या वीरे दी वेडिंगमधील हस्तमैथूनाच्या सीनवरून तर स्वरा कायमच ट्रोल होत असते.

swara-bhaskar

स्वराने तिच्यासोबत होणाऱ्या या ट्रोलिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की मी सोशल मीडियावर फूलाचा फोटो जरी शेअर केला तरी लोकं त्यावर हस्तमैथूनाबाबत कमेंट करतात.

swara-bhaskar

”सोशल मीडिया एक व्हर्च्युअर पब्लिक स्पेस आहे. जसे रोड व रेस्टॉरंट असतात अगदी तसेच. पण या रोड व रेस्टॉरंटमध्ये सामाजिक नैतिकता बाळगली जाते मात्र सोशल मीडियावर ती नैतिकत दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी आपण ज्या सभ्य प्रकारे वागतो तसे ऑनलाईन नाही राहत. वीरे दि वेंडींग रिलीज झाल्यापासून मी सोशल मीडियावर एका फुलाचा फोटो देखील शेअर करू शकत. त्याला देखील लोकं मास्टरबेशनच्या सीनसोबत लिंक करतात’, असे स्वरा भास्करने पोस्ट केले आहे.

‘हे फार वाईट आहे व सायबर सेक्श्युअल अत्याचार ठरते. पण मी या ऑनलाईन ट्रोलिंगला घाबरत नाही. मी सोशल मीडियावरही माझे भान कायम राखण्यावर विश्वास ठेवते.” असे देखील स्वरा भास्कर सांगते.

swara