
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. देशभरात यावरून अनेक शहरात हिंसा उसळली. नुपूर शर्मा यांना अनेकांनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यावरून भाजप खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने ट्विट करत टीका केली आहे.
Silence of so called ‘secular liberals’ on the sickening display of hatred & death threats throughout the country against a woman who has apologised is surely DEAFENING! #LetsTolerateIntolerance
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 12, 2022
‘नुपूर शर्मा यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. अशा महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. यावर स्वत:ला धर्मनिरपेक्षवादी म्हणवणारे शांत आहेत”, असे ट्विट गौतम गंभीर याने करत नुपूर शर्मा यांची पाठराखण केली आहे. त्यांच्या या ट्विट वरून अभिनेत्री स्वरा भास्कर हिने इंस्टाग्रामवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गौतम गंभीरच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत त्यावर ‘यांना बुलडोझरचा आवाज ऐकू येत नाही”, असे ट्विट केले आहे .


























































