नगर – स्विफ्ट कार चोरणारे पोलिसांच्या सापळ्यात अडकले, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील बोरुडेमळा या ठिकाणाहून स्विफ्ट कार चोरून नेणारे चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेश शिवाजी लोखंडे (वय 20, रा. लोंढेमळा, केडगाव,नगर) व संकेत सुनिल खापरे (वय 21, रा. विनायकनगर, नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर शहरातील बोरुडेमळा येथील सिद्धविहार अपार्टमेंट इमारती शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पार्कींग केलेली स्विफ्ट कार (एमएच 20, एजी 6758) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याची फिर्याद शशिकांत शिवाजीराव देशमुख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान सुपा एमआयडीसी चौक, नगर-पुणे रोड येथून दोन इसम गुन्ह्यातील नमूद सिल्व्हर रंगाचे स्विफ्ट कारमधून नगर-पुणे रोडवरून एमआयडीसीकडे जात असताना दिसले. पोलिसांनी सापळा रचून गणेश लोखंडे व संकेत खापरे यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आ

रोपींकडून 50 हजार रुपये किंमतीची सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार ही दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आली. मुद्देमालासह आरोपींना तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले. गणेश लोखंडे याच्यावर यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत.