प्रकाश सोगमने केली तीन सुवर्ण पदकांची कमाई; जलतरण स्पर्धेत दिव्यांगांची ‘सूर’भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या चौथ्या झोनल दिव्यांग जलतरण स्पर्धेत स्पर्धकांनी ‘सूर’भरारी घेत बाजी मारली. उपनगर पॅरा स्वीमिंग असोसिएशन व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. ५२ वर्षीय प्रकाश सोगम यांनी ५० मीटर प्रâीr स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक या गटात तीन सुवर्ण पदके मिळवून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. लहान मुले तसेच तरुणांसह पन्नाशी पार केलेल्या जलतरणपटूंनीही पदकांची कमाई करून वाहव्वा मिळवली.

या स्पर्धेत गतिमंद, दिव्यांग तसेच अंध अशा एवूâण ९५ जलतरणपटूंनी भाग घेतला. तीन सुवर्ण पदकांची कामगिरी केलेले प्रकाश सोगम यांनी यापूर्वीही राज्य, राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अनेक पदके पटकावून बाजी मारली आहे. अजय लालवाणी, आर्यन जोशी यांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदके मिळवली. महिला गटात मर्लिन डिमेलो हिने चार सुवर्ण तर भानू नाडर हिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.  छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांचे जलतरण स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वीमिंग असोसिएशनचे पदाधिकारी व लाईफगार्ड यांचेही मोठे योगदान मिळाले. यावेळी आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू राजाराम घाग व गीतांजली चौधरी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सत्यप्रकाश तिवारी, मनोज खैरे, ज्येष्ठ प्रशिक्षक पर्शी, उपनगर  पॅरा  स्वीमिंग असोसिएशनचे सचिव किशोर हेंद्रे, संदीप, संजय बोराळे, प्रतीक गुप्ता, एकदिशा अपंग सेवा संघाचे अनिल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.