खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि मनसोक्त डुबकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

पावसाळ्यातले हिरवेगार कोकण सर्वांना आकर्षित करत आहेत. कोकणात पावसाळ्यात खळखळून वाहणाऱ्या नद्या, तलावात डुंबण्याचा, पावसाळ्यात धो-धो वाहणारे धबधब्यात मनसोक्त चिंब भिजण्याचा आनंद वेगळाच असतो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यातले तलाव पोहण्याचे आमंत्रण देत आहेत. सुट्टीच्या वारी पावसाळ्यातील अशा पिकनिक स्पॉट्सना गर्दी होऊ लागली आहे. राजापूर तालुक्यातील आडीवरेतील नदीवर तरूण मंडळी मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.