स्विस चॉकलेट्स, घडय़ाळे स्वस्त होणार

हिंदुस्थान आणि आईसलँड, लिचेनस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या चार देशांची संस्था ईफटीए यांच्यात मुक्त व्यापार करार झाला असून हिंदुस्थानात 15 वर्षांत 100 अब्ज डॉलर गुंतवणुकीची हमी या देशांनी दिली आहे. या करारामुळे स्विस चॉकलेट्स, घडय़ाळे, बिस्किटे हिंदुस्थानात आता कमी किमतीत उपलब्ध होतील.