
सामना ऑनलाईन, मुंबई
हल्लीच्या दिवसांत बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात पेपर वाचनाऐवजी व्हॉटस्अॅपचे मेसेज वाचण्याने होते. वाचनाची सवय कमी होत चालल्याने 15 ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या वाचना प्रेरणा दिनानिमित्त ‘नो गॅजेट डे’ म्हणजेच एक दिवस मोबाईल, व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्विटरला सुट्टी देण्याचे आवाहन राज्याच्या मराठी भाषा विभागाने केले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून राज्य सरकारच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त एक दिवस ‘नो गॅजेट दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. म्हणजेच एक दिवस मोबाईल, व्हॉटस्अॅप, फेसबुकपासून लांब राहून तो वेळ पुस्तक वाचण्यासाठी देण्याचे आवाहन केले आहे.



























































