राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेट

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तब्बल 24 वर्षांनंतर क्रिकेटची रंगत पाहायला मिळणार आहे. 2022 सालामध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल गेम्समध्ये महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल गेम्स फेडरेशन व आयसीसी यांच्याकडून मंगळवारी याबाबत माहिती देण्यात आली. महिलांच्या टी-20 स्पर्धेत आठ संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार असून ही स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. याआधी 1998 साली कौलालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या