
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या यशस्वी आयोजनानंतर आता वाळवंटात पुन्हा एकदा चौकार-षटकारांचा पाऊस पडताना दिसणार आहे. नवीन वर्षात क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असून अबुधाबीमध्ये टी-10 लीगचे आयोजन केले जाणार आहे.
टी-10 लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे 10 षटकांची ही पहिली स्पर्धा आहे ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने मंजुरी दिली आहे.
अबुधाबीमध्ये आयोजित टी-10 स्पर्धा 28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या काळात खेळली जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने जैद क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. डेक्कन ग्लॅडिएटर, बांग्ला टायगर्स, टीम अबुधाबी, मराठा अरेबियन्स, पुणे डेव्हिल्स, दिल्ली बुल्स, कलंदर्स आणि नॉदर्न वॉरियर्स या आठ संघात विजेतेपदासाठी संघर्ष होणार आहे.
टी-10 लीगमध्ये वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी, वेस्ट इंडिजचा अष्टपैली खेळाडू ड्वेन ब्रावो यासारखे टॉपचे खेळाडू सहभागी होणार आहेत. ख्रिस गेल टीम अबुधाबी, आफ्रिदी कलंदर्स, ब्रावो दिल्ली बुल्स, आंद्रे रसेल नॉदर्न वॉरियर्स, सुनील नरेन टेक्कल ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळेल. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक मराठी अरेबियन्स, श्रीलंकेचा तिसारा परेरा पुणे डेव्हिल्स आणि इसुरू उडाना बांग्ला टायगर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील.
दरम्यान, टी-20 लीग आयोजकांनी जारी केलेल्या एका जाहिरातीत मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत 1000 षटकार ठोकणारा ख्रिस गेल म्हणाला की, ‘जेवढा छोटा सामना तेवढे आकर्षण जास्त. मी पुन्हा एकदा जैद क्रिकेट स्टेडियमनवर उतरण्यास उत्सुक आहे.’
Cricket’s most exciting format is back!
The Abu Dhabi T10 is returning to Zayed Cricket Stadium for the 4th edition of the tournament!
28 January – 6 February, 2021
Zayed Cricket Stadium
Abu Dhabi #AbuDhabiT10 #t10 #abudhabi #inabudhabi #abudhabicricket pic.twitter.com/x4jeAT98rc— T10 League (@T10League) October 7, 2020


























































