अमेरिका आणि पाकिस्तान यांच्याध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीती अमेरिकेने पाकिस्तानला पाणी पाजले. पाकिस्तानने विचारही केला नसेल अशा पराभावाला त्यांना सामोरे जावे लागले. अमेरिकेने या विजायसह स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करत ग्रुप ए मध्ये पहिले स्थान पटकावले. अमेरिकेच्या सलग दुसऱ्या विजायमुळे पाकिस्तानचे सुपर-8 मध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न साखळी फेरीतच नष्ट होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचा पुढचा सामना 9 जून रोजी बलाढ्य टीम इंडियाविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले आणि पुढच्या सामन्यात टीम इंडिया अमेरिकेविरुद्ध हारली तर, अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा संघ सुपर-8 मध्ये जाण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल. अमेरिकेचा संघ सलग तीन सामन्यांमध्ये जिंकल्यामुळे सुपर-8 साठी क्वालिफाय होईल. तसेच टीम इंडिया शेवटच्या सामन्यात कॅनडा विरुद्ध जिंकली तर 6 गुणांसह सुपर-8 साठी क्वालिफाय होईल. पाकिस्तान साखळी फेरीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकला तरी त्यांचे फक्त 4 गुण होतील. त्यामुळे पाकिस्तान सुपर-8 साठी पात्र ठरणार नाही.
टीम इंडिया, अमेरिका आणि पाकिस्तान तिन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले तर अशा परिस्थितीमध्ये ज्या संघांचा रनरेट चांगला असेल असे दोन संघ सुपर-8 साठी क्वालिफाय होतील.
जर अमेरिका टीम इंडियाकडून हारली आणि आयर्लंड विरुद्ध जिंकली. तसेच टीम इंडिया साखळी फेरीतील चारही सामने जिंकली तर टीम इंडिया आणि अमेरिकी सुपर-8 साठी क्वालिफाय होईल.
तुला मानलं भाऊ! पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सौरभसाठी सूर्याची खास पोस्ट
अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेट टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा अमेरिकेची खेळपट्टी पाहून चकीत झाला होता. त्याच्या मते या खेळपट्टीवर कोणताही संघ विजय मिळवू शकतो. सुपर-8 साठी कोणते दोन संघ ग्रुप ए मधून क्वालिफाय होतील याचे चित्र पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.