
फेब्रुवारी महिन्यामध्ये टी-20 वर्ल्डकपची सुरू होणार आहे. टीम इंडिया आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेला भिडणार आहे. पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा फडशा पाडून स्पर्धेची रुबाबात सुरुवात करण्याच्या हेतून हिंदुस्थानचा संघ मैदानात उतरेल. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिव्हिलर्सने आपल्या युट्यूब चॅनलवर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा गेम चेंजर खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंबाबतही त्याने भाष्य केलं आहे.
हिंदुस्थानच्या संघामध्ये सध्याच्या घडीला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्य भरीव योगदान देणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश असल्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सामना फिरवण्याची क्षमता खेळाडूंमध्ये आहे. तसेच काही मोठ्या नावांचा संघात समावेश करण्यात न आल्याचं सुद्धा तो म्हणाला आहे. एबीने हार्दिक पंड्याचा उल्लेख हिंदुस्थानचा गेम चेंजर खेळाडू म्हणून केला आहे. हार्दिक पंड्यामध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करण्याची धमक हार्दिकमध्ये आहे. हार्दिक फलंदाजीला उतरतो, तेव्हा आपोआप विरोधी संघावर दबाव निर्माण होतो. तसेच महत्त्वाच्या क्षणी मोठ्या फलंदाजांची विकेट काढण्यात सुद्धा तो तरबेज आहे, अस एबी डिव्हिलर्स म्हणाला आहे.
हार्दिक पंड्याव्यतिरिक्त अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवरी त्याने विश्वास दाखवला आहे. त्याच्या मते अभिषेक शर्मा सलामीला येऊ शकतो आणि संजू यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडू शकतो. शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा सारखे तगड खेळाडू संघात आपली जागा पक्की करू शकले नाहीत. त्यांचाही उल्लेख त्याने आपल्या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.





























































