
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये रविवारी (01 मार्च 2026) अटीतटीची लढत पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या आक्रमक गोलंदाजांपुढे हिंदुस्थानचे फलंदाज फार काळ मैदानात टीकू शकले नाहीत. त्यामुळे हिंदुस्थानचा पराभव होतो का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, संजू सॅमसनने शांत, संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या स्वप्नांना चुराडा केला. संजूची 97 धावांची नाबाद खेळी हिंदुस्थानसाठी वरदान ठरली.
संजू सॅमसनने एकहाती खिंड लढवत 50 चेंडूंमध्ये 12 चौकार 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 97 धावा केल्या. इतर फलंदाज हजेरी लावून माघारी परतत होते. मात्र, संजू सॅमसन शेवटपर्यंत टिकून राहिला आणि सामनाही जिंकवला. सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनच्या खेळीचे भरभरून कौतुक केलं. दोघांच्याही चेहऱ्यावर विजयाचे समाधान दिसत होते. यावेळी बोलत असताना संजू मध्येच ‘अब रुलायेगा क्या पगले’ असं म्हणाला आणि दोघेही खळखळून हसले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sanju Samson to Surya Kumar yadav: 🗣️ Rulaoge Kya Pagle 😭😂#SanjuSamson #indvswi #SuryakumarYadav pic.twitter.com/pNBBOZBJQR
— ` (@LoyalCskFan) March 2, 2026
हिंदुस्थानसह, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पहिली सेमी फायनलचा सामना कोलकातामध्ये 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे, तर दुसरा सेमी फायनलचा सामना 5 मार्च रोजी हिंदुस्थानविरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

























































