क्रिकेट विश्वयुद्धाची आज फायनल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप विश्वयुद्धाची अंतिम लढत अहमदाबाद येथे उद्या (दि. 8) रंगणार आहे. विश्वचषकाची झळाळती ‘ट्रॉफी’ हिंदुस्थानपासून फक्त एका पावलावर उभी आहे! पण त्या सुवर्णक्षणाच्या आड उभा आहे झुंजार वृत्तीचा न्यूझीलंडचा संघ. उपांत्य फेरीत दोन्ही संघांनी फलंदाजीची तोफ डागली असली, तरी अंतिम सामन्यात खरी कसोटी गोलंदाजांची लागणार आहे.

253 धावांचा डोंगर उभारूनही

इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानला अवघ्या 7 धावांनी निसटता विजय मिळाला. त्यामुळे हिंदुस्थानला अंतिम लढाईत गोलंदाजीची धार अधिक तीक्ष्ण करावी लागणार हे स्पष्ट आहे.

इतिहास बदलण्याची वेळ!

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 30 टी-20 सामने झाले आहेत. त्यापैकी 16 सामने हिंदुस्थानने, तर 11 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. मात्र, टी-20 विश्वचषकात चित्र उलटे आहे. 2007, 2016 आणि 2021 या तीनही वेळा न्यूझीलंडने हिंदुस्थानचा पराभव केला आहे. त्यामुळे हा अपमानाचा इतिहास पुसण्याची सुवर्णसंधी आता हिंदुस्थानसमोर उभी आहे.