‘तारक मेहता का…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, पत्रकार पोपटलालचाही बँड वाजणार

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लहानांपासून थोरांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत जेठालाल आणि दयाबेन यांनी आणि गोकुळधाममधील लोकांनी केलेल्या भूमिकेमुळे लोकांचे निखळ मनोरंजन झाले. परंतु 2017 ला दयाबेनने ही मालिका सोडली आणि त्याची रया गेली. परंतु आता या मालिकेत दयाबेनची पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

दयाबेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने सप्टेंबर 2017 हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सोडला होता. तिने मातृत्व रजा घेतली होती, मात्र यानंतर ती पुन्हा शोमध्य़े दिसली नाही. तीन वर्षांपासून ती शोमध्ये दिसली नसली तरी तिने शो सोडलेला नाही. चाहते देखील पुन्हा एकदा जेठालालसोबत दयाबेनला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 2021 मध्ये अर्थात याच वर्षी चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अंजली आणि तारक मेहता आपापसात चर्चा करत असतात आणि यात ते दयाबेनच्या पुनरागमनाबाबत बोलतात. 2021 चा पहिला दिवस धमाकेदार होता असे अंजली बोलते. यावर तारक मेहता, खूपच जास्त आणि देवाला प्रार्थना आहे की असा दिवस पुन्हा दाखवू नको. 2021 शांततेत जाऊ दे. यावर अंजली म्हणते की 2021 मध्ये फक्त पोपटभाऊ (पत्रकार पोपटलाल) चे लग्न होऊ दे आणि कोरोनाची लस सर्वांना मिळू दे.

अंजलीच्या या विधानावर तारक मेहता म्हणतो की, फक्त हे दोन मिशनच नाही तर दयाबेन देखील गोकुळधाममध्ये येऊ दे. यावर अंजली हे मिशन तर 2021 च्या सुरुवातीलाच लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवे असे म्हणते. गडा कुटुंब आणि संपूर्ण गोकुळधाम दया भाभी यांना मिस करत आहे.

अंजली आणि तारक मेहता यांच्या बोलण्यावरून दयाबेन लवकरच या शोमध्ये दिसण्याची शक्यता बळावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या