कोरोनातून बरे झालेले तब्लिगी करणार रक्तदान, प्लाझ्मा उपचारासाठी होणार उपयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आजारातून जे लोक बरे झाले आहेत, त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साध कंधावाली यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तबलिगी जमातच्या दोन व्यक्तींनी रक्तदान करण्याचे जाहीर केले आहे.

जे रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा हे प्लाझ्मा उपचारासाठी वापरण्यात येत आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. खान म्हणाले की, मौलाना साद यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तबलिगी जमातच्या दोन व्यक्तींनी रक्तदान करण्याचे मान्य केले आहे. यामुळे इतर कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होतील. सदर रुग्ण कोरोनातून बरे झाले असून ते सध्या दिल्लीत क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे असेही खान म्हणाले.

21 एप्रिल रोजी मौलान साद यांनी एक पत्रक जारी केले होते. त्यात त्यांनी तबलिगी समाजमधील जे लोक कोरोना आजारातून बरे झाले आहेत त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले होते.