
सामना प्रतिनिधी । मेहकर, जि. बुलढाणा
येथील दुर्गा तायक्वांदोच्या खेळांडूनी अमरावती येथे घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धेत विजय मिळवून राज्यस्तरावर खेळण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.
अमरावती येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या शालेय विभागीय स्पर्धेत १४ वर्षाआतील वयोगटात प्रणव दिपक लाहोटी, १७ वर्षाआतील गटात वैष्णवी अर्जुन इनकर, १९ वर्षे वयोगटात प्रविण गजानन इनकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर १७ वर्षाआतील वयोगटात मुलांमधून विशाल चव्हाण व मुलींमधून वैष्णवी अवस्थी, तर १४ वर्षाआतील वयोगटात मुलांमधून ओम अर्जुन इनकर व मुलींमधून शुभांगी लोढे हे व्दितीय आले आहेत. या विजयामुळे प्रथम क्रमांक पटकावलेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या खेळांडूनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीच्या प्रमुख दुर्गा इनकर (बांगर) यांना दिले आहे. राज्यस्तरीय स्पर्धा येत्या २९, ३०, ३१ व १ नोव्हेंबरला संभाजीनगर येथे होत असून मागील ९ वर्षापासून या अकॅडमीचे खेळाडू राज्यस्तरावर खेळत असून दरवर्षी यश मिळवत आहेत. या यशाबद्दल दुर्गा अकॅडमीच्या संचालिका तथा प्रशिक्षक दुर्गा इनकर (बांगर) व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




























































