पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेणे हाच एकमेव उपाय, हिंदुस्थानी वंशाच्या ब्रिटिश माजी खासदाराचे मत

पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेणे हाच एकमेव उपाय असे मत हिंदुस्थानी वंशाच्या ब्रिटिश खासदाराने व्यक्त केले आहे. तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे असेही खासदार म्हणाले.

मेघनंद देसाई हे मूळचे हिंदुस्थानी असून ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. देसाई हे माजी खासदार आहेत. दिल्लीत माध्यमांशी बोलताना देसाई बोलले की, पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात विलीन करणं हा एकमेव उपाय आहे. आपल्याकडे राजा हरि सिंह यांचे पत्रही आहे. कश्मीर आपले आहे.

तसेच पहलगाममध्ये झालेला हल्ला हा फारच धक्कादायक आहे. कश्मीर परत मिळवण्यासाठी सरकार योग्य प्रयत्न करत आहेत. हिंदुस्थान पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवलेच. हल्लेखोरांना चांगली शिक्षा मिळालीच पाहिजे जेणेकरून पुन्हा असा हल्ला होऊ नये असेही देसाई म्हणाले.