५०० रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

सुधारित सातबारा देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना मंठा येथे घडली. कैलास फकीरचंद सुंदर्डे (तलाठी सजा पिंपरखेड ख. अतिरिक्त सज्जा खोराड सावंगी, तहसील ता. मंठा) असे आरोपीचे नाव आहे.

विहिरीवर मोटारीसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी २०११-१२ मध्ये विहिरीची नोंद असलेल्या सातबारा दिला होता. परंतु, तक्रारदार यांना पुन्हा सातबारा आवश्यकता असल्याने तलाठी सुंदरर्डे यांच्याकडे मागणी केली. परंतु, सुधारीत सातबारा देण्यासाठी १ हजार रुपयांची सुंदरर्डे यांनी मागणी केली. याबाबत सापळा लावला असता, सुंदर्डे याने ५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक रविंद्र डी. निकाळजे, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, संदिप लव्हारे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रविण खंदारे यांनी पार पाडली.