तळजाई वसाहत परिसरात दुचाकीस्वारावर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीवर निघालेल्या दोघांना अडवून चोरट्यांनी एकावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना 16 नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरातील गांधी चौकात घडली. सम्राट मंडल (वय 28, रा. धनकवडी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरूद्धो सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सम्राट आणि त्यांचे मालक महेश दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी महात्मा गांधी चौकात चोरट्यांनी त्यांना अडवून दारूसाठी पैसे मागितले. मात्र, सम्राटने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने सम्राटवर वार करून गंभीररित्या जखमी केले. महेश यांनाही मारहाण करून दुचाकीचे नुकसान केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण तपास करीत आहेत.