रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर टॉकबॅक यंत्रणा

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील आरडाओरडा आता थांबणार आहे. तिकीट खिडकीला असलेल्या काचेमुळे प्रवासी आणि कर्मचाऱयांमध्ये योग्य संवाद होत नाही. त्यामुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱयाला मोठय़ा आवाजात ओरडावे लागते. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने स्थानकातील 436 तिकीट खिडक्यांवर टॉकबॅक यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱयांमध्ये योग्य संवाद होणार असल्याने तिकीट खिडकीवरील गोंधळ कमी होणार आहे.