
रात्रीच्या अंधारात मोबाईलवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जोशीविहीर (ता. वाई) येथे घडली. नवनाथ नंदकुमार जाधव (वय 25, रा. िंचधवली, ता. वाई) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे चिधवली गावावर शोककळा पसरली.
नवनाथ हा त्याच्या मित्रासह वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जोशीविहीरनजीकच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवणानंतर नवनाथ हा मित्राची दुचाकी घेऊन जोशीविहीर चौकात पानटपरीवर गेला होता. याच दरम्यान त्याला मोबाईलवर फोन आल्याने तो बोलत बोलत अंधारात विहिरीत पडला. या दरम्यान तेथील लोकांनी विहिरीत कोणीतरी पडले, असा आरडाओरडा केल्याने विहिरीत पडलेल्या तरुणाचा शोध सुरू केला.
पहाटे साडेपाचच्यादरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओळख पटल्यानंतर तो मृतदेह नवनाथ जाधव याचा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर िंचधवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद भुईंज पोलिसांत झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय धायगुडे तपास करीत आहेत.



























































