Navi Mumbai – तळोजात भीषण अपघात: नियंत्रण सुटलेल्या कारची 5 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू; कारचालक फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
 तळोजा येथील परिसरात एक अत्यंत भीषण हिट अँड रनची घटना समोर आली आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटून रस्त्यावरील तब्बल पाच गाड्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. धडक बसलेल्या वाहनांचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघात घडल्याचे समजताच आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून कारचालकाने माणुसकी बाजूला सारत घटनास्थळावरून पळ काढला. सध्या कारचालक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.