भाजपने ओमर अब्दुल्ला यांना पाठवले रेझर, नंतर डीलीट केले ट्विट

588

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात ते भल्या मोठ्या वाढलेल्या दाढीत दिसत आहेत. आता भाजपने त्यांना रेझर पाठवले आहे.  त्याचा स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. नंतर भाजपने हे ट्विट डीलीट केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यात अब्दुल्ला यांची मोठा दाढी वाढलेली दिसत होती. त्यावर तमिळनाडूच्या भाजपने त्यांना ऍमेझॉनवरून रेझर पाठवले आहे. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करून म्हटले आहे की, प्रिय ओमर अब्दुल्ला, तुम्हाला असे पाहने फारच निराशादायक आहे. तुमचे सर्व भ्रष्ट दोस्त बाहेर आनंद घेत आहेत. कृपया ही भेट स्विकारा आणि कसलीही मदत लागली तरी काँग्रेसशी संपर्क साधा. नंतर त्यावर गदारोळ झाल्याने तमिळनाडू भाजपने हे ट्विट डीलीट केले आहे.

bjp-deleted-tweet

या फोटोवर भाजप नेते गिरीराज सिंह यांनीही टिप्पणी केली होती. जम्मू कश्मीरमधून कलम 35 ए आणि 370 हटवले आहे वस्तरा नाही असे सिंह म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या