
नदीत पडलेल्या एका हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेणारे वन निरीक्षक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. हत्तीला वाचवताना त्यांचा मृत्यू झालं असल्याचे आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी ट्विट करून सांगितलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘सात वर्षाच्या एका हत्तीच्या पिल्लाला वाचवतना वन निरीक्षक सी. चंद्रू यांचा मृत्यू झाला. ते तामिळनाडूमधील उडुमलपेट या वनपरिक्षेत्रात बचाव दलात कार्यरत होते. हत्तीला वाचवताना वेगाने आलेल्या प्रवाहात ते वाहून गेले.’, अशी माहिती त्यांनी दिली.
‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, कोयंबटूर जिल्ह्यातील पोलाचीजवळ नदीत एक सात वर्षांचा नर हत्ती पडला होता. याबाबत माहिती मिळताच बचाव दल त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी निघाले. बचाव कार्यादरम्यान हत्ती मेला असल्याचे आढळले. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. मात्र यादरम्यान नदीत उतरलेले चंद्रू पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
वनपरिक्षेत्र अधिकारी सी. धनबलन यांनी सांगितलं की, चंद्रू डिसेंबर 2019 मध्ये वन बचाव दलात रुजू झाला होता. हा त्याचा पहिला बचाव अभियान होता. ते पुढे म्हणाले, अग्नीशमन दल, वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तो मिळाला नाही.
Today #forest watcher C. Chandru (24) lost his life while rescuing a seven years old male #elephant. He was part of a team on rescue work at Udumalpet Forest Range, Tamil Nadu. Washed away by the strong current in the Contour canal. Rest in peace soldier pic.twitter.com/BnqzPnrql7
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) May 10, 2020



























































