नाना पाटेकर यांच्या अडचणीत वाढ; तनुश्रीने सादर केलं 40 पानी डॉक्युमेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर आता बॉलीवूडमध्ये ‘मी टू’चं वादळ आलं आहे. मात्र तनुश्री फक्त आरोप करून थांबली नाही तर तिनं याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तनुश्री दत्ताच्या वकिलानं 40 पानी डॉक्युमेंट मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केलं आहे.

तनुश्रीच्या वकिलानं सुपूर्द केलेल्या या 40 पानी डॉक्युमेंटमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मुंबई पोलीस सर्व गोष्टींची शहानिशा करतील.

दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील कायदेशीर मार्गानं पावलं उचलली आहेत. 10 वर्षा पूर्वी आपण जे बोललो त्यावर आज देखील ठाम असल्याचं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र वकिलांनी बंधन घातल्यामुळे आपण मीडियासमोर फार काही बोलू शकत नाही, असं नानांनी आधीच सांगितलं आहे. नाना पाटेकर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याकडून तनुश्रीला कायदेशीर नोटीस मिळाल्याचं तिनं मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.